रावेर तालुक्यात केऱ्हाळा बुद्रुक हे गाव आहे. या गावातील रहिवासी प्रतीक्षा रवींद्र भिल वय २० ही तरुणी आपल्या घरी सांगून गेली की मी रावेर शहरातील व्ही.एस. नाईक कॉलेजमध्ये जात आहे. तेव्हापासून घरातून बाहेर गेलेली तरुणी नंतर घरी परत आलीच नाही. तिचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ती कुठेच मिळून आली नाही म्हणून रावेर पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे.