जिल्ह्यातील 64 गावांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जेसीबीमुळे फुटल्याची घटना अकोल्यातील दहिगाव गावंडे गावाजवळ घडली आहे. यामुळे लाखो लिटर पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय झाला आहे. जलवाहिनीतील पाण्याच्या धारा तीस ते चाळीस फूट उंच उडत होत्या. दरम्यान बाजूच्या शेतात पाणी गेल्याने दोन एकर शेतीचे देखील या पाण्यामुळे नुकसान झालं आहे. अकोला ते मूर्तिजापूर मार्गावर सध्या पुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान जेसीबीमुळे काम सुरू असतानाच ही जलवाहिनी फुटली आहे. दुरुस्तीचे काम तातडीने करण्याची मागणी केली.