लातूर -लातूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्रीमती मानसी यांच्या आदेशानुसार उपायुक्त डॉ पंजाबराव खानसोळे यांनी लातूर शहरात धडक मोहीम सुरू केली असून आज दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान लातूर शहरातील सिंगल युज प्लास्टिक बंदी बाबत शहरातील गंजगोलाई भागातील दोन गोडावुन मध्ये धडक कारवाई करून एकूण ५५० किलो (अंदाजे ८० हजार रूपये किंमतीचा प्लास्टिक साठा) जप्त करण्यात आला.