आडगाव या गावापासून जवळच असलेल्या सातपुड्याच्या कुशीतील श्री क्षेत्र सातपुडा निवासिनी मंदिरात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सालावादाप्रमाणे यावर्षी देखील येथील दुकानदारांनी भाविक भक्तांसाठी साबुदाणा खिचडी तयार केली होती व तो प्रसाद म्हणून वितरण करण्यात आली. सकाळपासून भावीक, भक्तांची दर्शनासाठी मंदिरात गर्दी झाली होती सायंकाळपर्यंत प्रसाद वाटप सुरू होता.