गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा परिसरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करून इमारती जमीन दोस्त केल्या जात आहेत. रहिवाशी इमारती तोडल्या जात असल्यामुळे नागरिक बेघर होत आहेत. सकाळच्या सुमारास शीळ महापौर येथे कारवाई करण्यासाठी मोठा पोलिसांचा पोस्ट फाटा घेऊन अतिक्रमण विभागाचे पथक गेले होते. मात्र यावेळी रहिवाशी रस्त्यावर उतरले आणि आक्रमक भूमिका घेऊन प्रचंड विरोध केला. यावेळी अतिक्रमण विभागाचे अधिकारी आणि रहिवाशी आमने-सामने आले होते. काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते