भंडारा तालुक्यातील गोपेवाडा येथील प्रशांत देवानंद बनसोड वय 30 वर्षे याने दिनांक 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता दरम्यान त्यांच्या घराशेजारीच राहत असलेले त्यांचे कुटुंबीय आरोपी हर्षल मुकेश बनसोड वय 23 वर्षे व हिमांशू मुकेश बनसोड वय 21 वर्षे यांना प्रशांत याने तुमच्या घराच्या कोंबड्या ह्या आमच्या घरी येऊन घाण करतात तसेच तुम्ही माझ्या वडिलांसोबत भांडण का केले. याबाबत हटकले असता दोन्ही आरोपींनी प्रशांत सोबत भांडण करून त्याच्या नाकावर लोखंडी कड्याने मारहाण केली.