कर्नाटक राज्यतुन चोरी करून पळालेल्या चोरट्यांना भिवघाटात थरारक पाठलाग करून पोलिसांनी पकडले. राजेंद्र शेर बम (वय ३०), एकेंद्र कटक बडवाल (वय ३१) आणि करणसिंह बहादुर धामी (वय ३४, सर्व रा.धनगेडी जि.कैलाली) असे ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत. या चोरट्यांकडून १ कोटी ५० लाख ३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. विटा पोलीस ठाण्याच्या पथकणे ही मोठी कारवाई केली आहे. कर्नाटक राज्यातील निकसे जिल्हातील मंगळूर येथे घरफोडी करून घरातील सोने-चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम घेऊन पलायन करत