औसा -औसा तालुक्यातील विकासकामांचं वास्तव पुन्हा एकदा उघड होत आहे. काल अनेक वर्तमानपत्रांमधून "औसा तालुका हरितक्रांतीच्या दिशेने वाटचाल करत आहे" अशा बातम्या झळकल्या. मुख्यमंत्री महोदयांनी तब्बल १९० कोटी दिल्याची घोषणा झाली आणि त्यावरून हरितक्रांतीची गाजावाजा सुरु झाली.पण खरा विकास मात्र नागरिकांना कुठेच दिसत नाही. त्याचबरोबर आज औसा तालुक्यात एक वेगळीच जलक्रांती देखील दिसून आली. औसा विधानसभा मतदारसंघातील आलमला गावच्या परिसरात हजारो कोटी रुपये खर्च करून रस्त्यांची कामे केली.