मराठा समाजास सरसकट आरक्षण जाहीर करावे या मागणीसाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदान मुंबई येथे शुक्रवार 29 ऑगस्ट पासून बेमुदत उपोषणास सुरू केले आहे. यावेळी संपूर्ण परिसरात मराठ्यांचा जनसागर उसळल्याचे दिसून आले. परभणीचे खासदार संजय जाधव त्यांच्या समर्थक शुक्रवारी सकाळी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन उपोषणास पाठिंबा देत सहभागी झाले आहेत. यावेळी बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग आप्पा सोनवणे यांचीही उपस्थिती होती.