आज रविवार 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने माहिती देण्यात आली की, पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, पहाडसिंगपुरा परिसरात आरोपी विजय रमेश काळे वय 32 वर्ष राहणार पार्वती नगर छत्रपती संभाजी नगर हा दुर्मिळ मांडूळ प्रजातीचा साप तस्करी करण्यासाठी घेऊन येत आहे, पोलिसांनी आरोपीला अटक करून त्याच्या ताब्यातून दुर्मिळ मांडूळ साप जप्त करण्यात आला आहे आरोपी विरुद्ध बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .