राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या धडकेत दुचाकीचालक जागीच ठार झाला. ही घटना शुक्रवार दि. २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास महागाव तालुक्यातील करंजखेड फाट्यासमोर घडली. संजय रामचंद्र भांगे रा. करंजखेड असे अपघातात ठार झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. शुक्रवारी अमरावती उमरखेड एसटी महामंडळाची बस क्र. एमएच-१३ सीयु-८७२७ ही अमरावती वरून यवतमाळ मार्गे महागाव येत हाती. दरम्यान, करजंखेड फाट्यावर एसटी बस आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, दुचाकीचा अक्षरशः चुरडा झाला