तुमसर तालुक्यातील झारली येथे घरासमोर उभ्या ठेवलेल्या 4 ट्रॅक्टरच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना दि. 30 ऑगस्ट रोज शनिवारला सकाळी 8 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.यातील फिर्यादी दिलीप पटले ,मनोज पटले, सुरेंद्र पटले, राहुल ताराचंद पटले यांनी आपल्या मालकीची ट्रॅक्टर घरासमोर उभी ठेवली असता अज्ञात आरोपींनी 4 ट्रॅक्टर मधील बॅटऱ्या लंपास केले. या प्रकरणी अज्ञात आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.