गणरायाच्या आगमनाबरोबर सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे जोरदार पुनारागमन झाले आहे. सातत्याने गेले दोन दिवस पाऊस सुरू असल्याने प्रमुख धरणांमधील पाणी साठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. बुधवारी कोयना, धोम, कण्हेर आणि धोम बलकवडी या धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सिंचन विभागाकडून या संदर्भातील माहिती दुपारी साडेबारा वाजता देण्यात आली. कोयना धरणामध्ये सकाळी आठ वाजेपर्यंत 101.35 टीएमसी पाणीसाठा झाला असून धरण 96. 29 टक्के भरले आहे. धरणामध्ये पाण्याचा येवा वाढला.