मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूर,सांगलीसह राज्याच्या विविध भागांतून सर्वसामान्य मराठा बांधव स्वखर्चाने मुंबईकडे मार्गस्थ झाले.या पार्श्वभूमीवर, आंदोलनासाठी जाणाऱ्या गाड्यांना टोल माफ करण्याची मागणी शासनाकडे वारंवार करण्यात आली होती.मात्र,शासनाने टोल माफीसंदर्भात स्पष्ट आदेश दिले की नाही याबाबत संभ्रम असताना अनेक टोल नाक्यांवर अधिकारी उर्मटपणे वागत असल्याचे निदर्शनास आले आहे.