आंतरराज्य गांजा तस्करीचे मोठे रॅकेट उघडकीस आणत कल्याण पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी करत 13 आरोपींना जेरबंद केले आहे.कल्याण,सोलापूर,ठाणे,विशाखापट्टणम येथून 13आरोपींन115 किलो गांजा,पिस्तूल,वॉकी टॉकी,रिक्षा दुचाकी,कार अशा एकूण सत्तर लाखाच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या हाती लागू नये म्हणून आरोपी अनोखी सकल लढवत होते विशाखापटनम येथील जंगलामध्ये मोबाईल ऐवजी ते वॉकी टॉकीचा वापर करत होते तर कोणी हल्ला केला तर त्यांना मारण्यासाठी पिस्तूल आणि इतर शस्त्र देखील बाळगत होते.