शहरात यंदा गणेश विसर्जन अधिक पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशासनाने विशेष उपाययोजना केल्या आहेत. कृत्रिम तलावाची निर्मिती करून प्रशासनाने पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक जलस्रोतांमध्ये मूर्ती विसर्जनास बंदी असल्याने, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर नगरपालिकेने आज दिनांक ४ सप्टेंबर सायंकाळी ५ वाजता प्रथमच कृत्रिम जलकुंड खोदले आहे. हे जलकुंड ५ फूट खोल, ६ फूट रुंद आणि ५ मीटर लांबीचे आहे.