सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जर रस्ते खराब असतील किंवा रुंदीकरणाचे काम सुरू असेल,तर अशा मार्गांवर टोल आकारणी करता येणार नाही.या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज शुक्रवार दिनांक 22 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता किणी टोल नाक्यावर जोरदार आंदोलन करत कोल्हापूर ते पुणे मार्गावरील टोल वसुली तातडीने बंद करण्याची मागणी केली.सध्या पुणे-कोल्हापूर महामार्गावर रुंदीकरणाचे काम सुरू असून,रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.