अनंत चतुर्थीच्या दिवशी आपल्या लाडक्या बापाला भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला.जेलरोड भागातील दसक गोदावरी नदी येथे हजारो भाविकांनी ढोल ताशाच्या गजरात तसेच "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर" अशा घोषणा देत श्री गणेशाची मनोभावी आरती करून निरोप दिला.यावेळी गोदावरी नदीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.दोन ते तीन दिवसापासून संततधार सुरू असलेल्या पावसाने गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.