रावेर तालुक्यात वाघोड हे गाव आहे. या गावातील रहिवाशी अक्षय सुभाष पाटील वय २८ या तरुणाला इलेक्ट्रिक शॉक लागला होता. त्याला उपचाराकरिता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले होते तेथे त्याचा मृत्यू झाला. तेव्हा याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.