यावल शहरात बोरावल गेट आहे या बोरावर गेट भागात शबरी नगर आहे या शबरीनगरात सरिता भिल वय ३० या नऊ महिन्याच्या गरोदर मातेला चक्कर आले आणि ती जमिनीवर कोसळली. तातडीने तिला ग्रामीण रुग्णालय यावल येथे नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी तपासणी करून तिला मयत घोषित केले. महिलेचा मृत्यू कसा झाला यासाठी तिचा मृतदेह जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला आहे. तर याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.