अमरावती महानगरपालिकेच्या वतीने २ व ३ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या मालमत्ता कर वसुली शिबिरांना नागरिकांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून, आज २ ऑगस्ट शनिवार रोजी सायंकाळी साडे ५ वाजता पर्यंत शिबिराच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण शहरातून तब्बल १ कोटी ६० लाख रुपयाची विक्रमी रक्कम वसूल करण्यात आली.करदात्यांनी मोठ्या संख्येने शिबिरांना भेट देत सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत आपले कर भरणे प्राधान्याने पार पाडले. झोननिहाय वसुली पुढीलप्रमाणे झाली आहे: झोन क्रमांक १ मध्ये ३७ लाख २६ हजार व झोन क्रमा