मारेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर (वय 57) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज (23 ऑगस्ट) रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे पोलिस दलासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी त्यांच्यावर नागपूर येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम संस्कार शासकीय इतमामात करण्यात आले