स्थानिक गुन्हे शाखा भंडाराचे पथक दिनांक 26 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता दरम्यान भंडारा तालुक्यातील अंबाडी ते भिलवाडा रोडवर पेट्रोलिंग करीत असताना स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा एक ट्रॅक्टर व स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर क्रमांक एमएच 36 एएल 1565 या ट्रॅक्टरचे चालक-मालक आकाश खोब्रागडे वय 29 वर्षे व अनिल ठाकूर वय 27 वर्षे दोन्ही रा. सूरवाडा पुनर्वसन यांनी त्यांच्या ताब्यातील दोन्ही ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये 2 ब्रास रेती विना पास परवाना अवैधरित्या रेतीची चोरटी वाहतूक करताना मिळून आले.