कळंब तालुक्यातील भाटशिरपुरा गावात दि.22 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता बैलपोळा सणावर मनोज जरांगे पाटलांची छाप दिसुन आली आहे.बैलाच्या पाठीवर मनोज जरांगे पाटलांच चित्र रेखाटले होते तर बैलाच्या मिरवणुकीत मनोज जरांगे यांच्या समर्थनाची गाणी वाजवण्यात आली.एक मराठा लाख मराठा घोषणा बैलांच्या पाठीवर लिहिली होती. मुंबईत होणाऱ्या आंदोलनाला येण्याची बैलपोळा सणातून शेतकऱ्याकडून साद घालण्यात आली. शेतकऱ्याकडून अनोख्या पद्धतीने पोळा सण साजरा करण्यात आला.