एरंडोल तालुक्यात पिंपळकोठा खुर्द हे गाव आहे. या गावातील रहिवाशी दीपक सुखदेव हटकर वय २८ हा तरुण आपल्या घराबाहेर जात होता दरम्यान त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याला तातडीने ग्रामीण रुग्णालय एरंडोल येथे नेण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मयत घोषित केले. तेव्हा या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.