मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सुवर्णसंधी असून प्रत्येक ग्रामपंचायतीने प्रामाणिक प्रयत्न केल्यास राज्यस्तरीय बक्षिसे मिळविता येऊ शकतात,असे मत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता व्यक्त केले. जयसिंगपूर येथील स्व.शामराव पाटील यड्रावकर नाट्यगृहात तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले, लोकसहभाग हा या अभियानाचा गाभा आहे.