शहरातील वरोरा मार्गावरील एका बारचे मालक व मॅनेजरला तब्बल 8 ते 10 महिलांनी मारहाण करीत डोळ्यात तिखट पावडर फेकला. शनिवारी दुपारी 1.30 वाजता घडलेल्या या घटनेबाबत न्यू ज्योती बारचे मालक मनोज उरकुडे यांच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात 4 महिलांसह 8 जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.