गणेशोत्सवाच्या तोंडावर नांदुरा नंतर आता खामगाव येथील एका घरातून ७ धारदार तलवारी आज दिनांक २३ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजे दरम्यान जप्त केल्या. या कारवाईत पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी पकडण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. मेहबुब नगर चांदमारी घरकुल येथील अब्दुल इम्रान अब्दुल जलील रा.मेहबुब नगर शेख इरफान शेख भिकारी कुरेशी रा.नादुरा,शेख नदीम शेख सरदार यांच्या ताब्यातून तलवारी जप्त.