तालुक्यातील येडशी गावातुन जाणारा लातुर - टेंभुर्णी महामार्गाचे गेली पाच महीन्यापासुन काम रखडले असुन,हा रस्ता उखडून ठेवलाय तर हा रस्ता करत असताना येडशी गावाला तेरणा धरणातुन पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन देखील खोदली गेली त्यामुळे येडशी गावाचा पाणीपुरवठा देखील बंद आहे त्यामुळे नागरीकांना ट्रॅंकर द्वारे पाणी विकत घेण्याची वेळ आलीय,त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करुन पाईपलाईन दुरूस्त करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी दि.8 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता रास्ता रोको आंदोलन केले.