कॉंग्रेस पक्षाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वर्गवासी मातेचा अपमानकारक ए आय टेक्नॉलॉजी द्वारे व्हिडिओ प्रसारीत केला आहे. काँग्रेसने एआय व्हिडिओद्वारे केलेला अपमान हा फक्त पंतप्रधान मोदीजींच्या मातेचा अपमान नसुन देशातील सर्व माता-भगिनींचा अपमान आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. "माँ का अपमान – नहीं सहेगा हिंदुस्तान" असा इशारा भाजप भंडारा जिल्हा महामंत्री कल्याणी तिरपुडे यांनी दि. १३ सप्टेंबर रोजी सायं. ६ वा. दरम्यान दिला आहे.