कौसडी-वालुर रस्त्यावर महादेव मंदिरासमोर दुचाकी व बैलगाडीचा भीषण अपघात झाल्याची घटना गुरुवार ११ सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली. महादू बाळासाहेब डोंबे वय २५ वर्ष हा युवक दुचाकी क्र. MH-38 Z 7631 वरून कौसडीहून आपल्या गावाकडे जात होता. दरम्यान, कौसडी येथील शेतकरी बालासाहेब लक्ष्मण शिंदे वय ४३ वर्ष हे शेतातील काम आटोपून बैलगाडीने गावाकडे परतत असताना दुचाकी व बैलगाडीची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की दुचाकी चालक डोंबे गंभीर व शिंदे हे दोघे जण गंभीर जखमी झाले