कर्नाटका एम्टा खुल्या कोळसा खाणीने संपादीत केलेल्या बरांज मोकासा गावच्या पुनर्वसन संदर्भात कंपणी आणी शासन पक्षपातीचे धोरण अवलंबीत असुन दलालामार्फत संबंधीत अधिकारी आर्थीक मोबदला घेऊन घरांना पात्र करीत असल्याचा आरोप बरांज येथील सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल पुनवटकर यांनी पत्रकार संघाच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेतून केला आहे.शासन मालमत्ता धारकांना २००९-१० चा पुरावा मागत आहे.मात्र मध्यंतरी खाण बंद असल्यामुळे तारखेचा विचार करण्यात यावा असेही पत्रपरिषदेतून सांगण्यात आले.