कोरेगाव तालुक्याच्या दक्षिण भागातील दुर्गळवाडी येथील ग्रामस्थांचा महत्वपूर्ण जमिनीच्या विषयाच्या अनुषंगाने सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन खासदार नितीनकाका पाटील यांनी पुढाकार घेतला आहे ग्रामस्थांना बरोबर घेत त्यांनी शनिवारी दुपारी चार वाजता जिल्हाधिकारी संतोष पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. दुर्गळवाडी गावठाणामधील पन्नास टक्के जागेवर वसलेल्या ठिकाणाला शासनाने अतिक्रमण म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यासंदर्भात ग्रामस्थांनी आपली भूमिका आणि म्हणणे मांडले.