वडिलांच्या शेतजमिनीच्या ठोक्याचे पैसे आताच का देत नाहीस, असे म्हणत भावाशी वाद घालून भावजयीस शिवीगाळ करून मारहाण केली.याप्रकरणी एकाविरुद्ध काल सोमवारी दुपारी 1 वाजता चारठाणा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.सेलू तालुक्यातील बोरकिनी येथील दिगंबर दत्तराव दराडे, अर्जुन दत्तराव दराडे हे दोघे सख्खे भाऊ असून, दरम्यान दिगंबर दराडे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अर्जुन दराडे याने वडिलांच्या शेतजमिनीच्या ठोक्याचे पैसे आताच का देत नाही म्हणून दिगंबरशी वाद घातला.