गंजमाळ, म्हाडा बिल्डिंग येथे दोन महिन्यापूर्वी झालेल्या वादाची कुरापत काढून एकाला दगडाने मारहाण केल्याची घटना घडली असून भद्रकाली पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.विशाल गौतम येडे राहणार भिमवाडी, म्हाडा बिल्डींग,गंजमाळ हे घराच्या खाली उभे असताना संदीप संतोष चव्हाण व संतोष संपतराव चव्हाण या दोघांनी जुन्या वादाची कुरापत काढून वाईट साईट शिवीगाळ करीत दगडाने मारहाण केली. यात फिर्यादी हे गंभीर जखमी झाले आहेत.