सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला असून कोयना धरणातून पाणी सोडण्याचे प्रमाण शुक्रवारी दिवसभरात कमी करण्यात आले होते. रात्री आठ वाजता धरणाचे सर्व सहा दरवाजे बंद करण्यात आले आहेत. पायथा विद्युत गृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान, धोम, उरमोडी आणि तारळी या धरणांमधून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. महाबळेश्वर, जावली आणि पाटण तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा येवा वाढला होता. कोयना धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग केला जात होता.