पुणे बंगळुरू महामार्गावरील कराड मलकापूर येथील उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असताना देखील ठेकेदार कंपनीने उड्डाणपुलाखालील रस्ता गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी खुला करून दिला नाही, त्याचा तीव्र शब्दात निषेध करत सामाजिक कार्यकर्ते दादा शिंगणे यांनी स्वतः पुढाकार घेत शनिवारी सकाळी दहा वाजल्यापासून रस्ता खुला केला. मलकापूर, नांदलापूर, आगाशिवनगर व कोयना वसाहत परिसरातील गणेशोत्सव मंडळाचे गणपती आणि घरगुती गणपती हे कृष्णा नदी पात्रात विसर्जन करण्यासाठी या मार्गाने जातात.