मुंबईत आझाद मैदान येथे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आ. शशिकांत शिंदे यांनी सोमवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मराठा आरक्षणाच्या बाबतीत ज्या ज्या वेळी आंदोलन झाली त्या त्यावेळी मी सहकार्याची भूमिका घेतलेली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.