भारत सरकारच्या क्रीडा विभागाच्या निर्देशानुसार फिट इंडिया मोहिमेंतर्गत राज्यभरातील पोलीस दलाकडून रविवार दि. 24 ऑगस्ट रोजी फिट इंडिया सायकलिंग ड्राईव्ह हा विशेष उपक्रम राबविला जाणार आहे. सातारा जिल्हा पोलीस दलाच्यावतीने सकाळी सात वाजता साताऱ्यातील पोलीस कवायत मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पोलीस मुख्यालयातील उपअधीक्षक अतुल सबनीस यांनी या संदर्भात जिल्ह्यातील सायकल प्रेमी समूहांना रीतसर पत्र पाठवून निमंत्रण दिले आहे. त्याबाबतची माहिती शुक्रवारी सकाळी अकरा वाजता मिळाली.