तुमसर तालुक्यातील आग्री येथे दि. ३० ऑगस्ट रोजी पोलिसांना गोपनीय माहितीच्या आधारे अवैध दारू अड्ड्यावर धाड घातली असता आरोपी राकेश परतेकी वय २८ वर्षे रा. आग्री याच्या ताब्यातून एकूण १२०० किलोग्रॅम सडवा मोहपास एकूण किंमत ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आल्याने सदर आरोपीवर तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा तुमसर पोलिसांनी तपासात घेतला आहे.