शिरोळ–मिरज मार्गावरील अर्जुनवाड येथील कृष्णा नदीवरील पूल सध्या अतिशय धोकादायक अवस्थेत आहे.पुलावरील लोखंडी संरक्षक कठडे अनेक ठिकाणी तुटलेले असून, या ठिकाणी वाहनधारकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.त्यामुळे एखादी जीवघेणी दुर्घटना घडून जनतेचा जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का,असा संतप्त सवाल दिपक पाटील यांनी आज बुधवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता व्यक्त केला.