तुमसर पोलीस ठाणे हद्दीतील एका गावात एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाने एका अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात फसवून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले यादरम्यान सदर अल्पवयीन मुलगी सहा महिन्याची गरोदर झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी दिनांक 24 ऑगस्टला पीडित मुलीच्या आईने तुमसर पोलिसात तक्रार दाखल केली. यावेळी पोलिसांनी अल्पवयीन मुलाविरोधात पोक्सो कायदा अन्वये तुमसर पोलिसात गुन्हा दाखल केला असून घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पूनम साठे करीत आहेत.