गोंड राजाचा इतिहास चंद्रपूर शहराशी जोडलेला आहे. चंद्रपूर शहराची पार्श्वभूमी आणि इतिहास लक्षात घेऊन लेखक उषाकिरण आत्राम यांनी येथे महाराणी हिराई यांचे स्मारक बांधण्याची आणि किल्ल्याच्या चारही दरवाज्यांना गोंड राजाचे नाव देण्याची मागणी आज दि 31 आगस्ट ला 4 वाजता श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. अन्यथा विविध आदिवासी संघटनांसह तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.