तारदाळ-खोतवाडी संयुक्त जलजीवन योजनेसाठी मंजूर झालेल्या तब्बल ५३ कोटी रुपयांच्या निधीचे काम तीन वर्षांनंतरही अपूर्ण आहे.योजनेची पूर्णत्वाची मुदत संपूनही सहा महिने उलटले असून,गेल्या आठ महिन्यांपासून कामात कोणतीही प्रगती झालेली नाही.त्यामुळे ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.या योजनेच्या रखडलेल्या कामाविरोधात माजी ग्रामपंचायत सदस्य विनोद कोराणे हे आमरण उपोषणास बसले होते.त्यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस.कार्तिकेयन यांनी लेखी आश्वासन दिले होते.