कोल्हापूर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात प्रथम मानाचा गणपती तुकाराम माळी तालीम मंडळाच्या बाप्पाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात आणि ढोल-ताशांच्या गजरात सुरू झाली.या मिरवणुकीनंतर शहरातील इतर गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकांनाही सुरुवात झाली.विसर्जन सोहळ्याची सुरुवात कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर,खासदार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेस नेते सतेज पाटील तसेच विविध प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते आरतीने करण्यात आली.बाप्पाला ढोल-ताशांच्या गजरात, जल्लोषात निरोप देण्यात आला.