त्याग, संस्कार आणि दूरदृष्टीने स्वराज्याचे बीज रोवणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्यामुळेच हिंदवी स्वराज्याचा सुवर्ण इतिहास घडू शकला. सिंदखेडराजा या त्यांच्या जन्मभूमीतील स्मारकाची अवस्था योग्य नाही. याबाबतीत तातडीने पावले उचलून स्मारकाला झळाळी द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी केल्यानंतर अवघ्या काही तासातच भारतीय पुरातत्त्व विभागाने थेट मुंबईतून यंत्रणा गतिमान करत नगरपालिकेच्यावतीने प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली.