पनोरी ता.राधानगरी येथे ७३ वर्षांच्या श्रीमंती हरी रेवडेकर या वृद्धेचा घरात खून करून प्रेत गोबरगॅसमध्ये फेकल्याचा गंभीर प्रकार ७ सप्टेंबर रोजी उघडकीस आला.राधानगरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, राधानगरी पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या संयुक्त तपासातून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांच्या सूचनेवरून गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्यात आला.