इचलकरंजी शहरातील पंचरत्न मंगल कार्यालयाजवळ आज शनिवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता भरदिवसा किरकोळ वादातून मित्रानेच मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली.या हल्ल्यात रावजी मारुती कोंडीग्रे (वय ३८, रा. गणेशनगर, गल्ली क्र.९) गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.या घटनेची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की रावजी कोंडीग्रे आणि त्याचा मित्र दोघेही एका बारमध्ये मद्यपान करत होते.