तुमसर शहरातील बोस नगर येथे दि. 1 सप्टेंबर रोज सोमवारला सायं.7 वा.च्या सुमारास भंडारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी हेमंत भांडके यांच्या पान केला च्या दुकानात झडती घेतली असता त्यांच्या पानठेलाच्या दुकानातून विविध कंपनीची एकूण 85 हजार रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त केला. या प्रकरणी आरोपी विरुद्ध तुमसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.