फैजपूर ते साखर कारखाना जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावर हॉटेल अन्नपूर्णा आहे. हॉटेल जवळ छोटा हत्ती वाहन क्रमांक एम.एच.०२ वाय. ए. ६७९९ याद्वारे जहांगीर तडवी अवैधरित्या गोवंश वाहतूक करत होते. पोलिसांनी त्यांना पकडले त्यांच्याकडून गोवंश वाहन असा एकूण एक लाख २५ हजाराचा मुद्देमाल जप्त केला व त्यांच्याविरुद्ध फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.